युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

    दिनांक :08-May-2026
Total Views |
तालुक्यातून पहिले तीन विद्यार्थी शाळेचे

उमरखेड, 
Universal English School युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूलचा मागील 21 वर्षापासून इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागण्याची परंपरा याही वर्षी अखंड ठेवत विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक केला ओवी महेश चिन्नावार हिने 97.20 टक्के गुण प्राप्त करून उमरखेड तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर समृद्धी सुनील निलावार हिने 96.60 गुण घेऊन तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आणि आयुष संजय देशमुख या विद्यार्थ्याने 96 टक्के गुण घेऊन तालुक्यात तिसरे स्थान मिळविले.

uni 
 
Universal English School  परीक्षेला एकूण 60 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 53 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले तर 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष जैन, उपाध्यक्ष कमल माहेश्वरी, सचिव संतोष माहेश्वरी आणि सर्व संचालक मंडळासह मुख्याध्यापक मनीषा फुलेवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय ठाकरे, शाळेचे शिक्षक व कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.