विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा ‘बॉलर्स की खोज’ उपक्रम

- १६ मे रोजी ‘ओपन सिलेक्शन ट्रायल्स’

    दिनांक :08-May-2026
Total Views |
गोंदिया,
vidarbha cricket associations विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) च्या महत्त्वाकांक्षी बॉलर्स की खोज या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यात ओपन क्रिकेट सिलेक्शन ट्रायल्सचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व विदर्भातील वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही निवड प्रक्रिया आगामी विदर्भ प्रीमियर लीग (व्हीपीएल) सिझन-२ अंतर्गत आयोजित करण्यात येत असून पुरुष गटातील १६ ते २५ वर्षे तसेच महिला गटातील १५ ते २३ वर्षे वयोगटातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.
 
 
 
vidarbha cricket associations
 
 
ट्रायल्सचे आयोजन शनिवार, १६ मे रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून पूजा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, खमारी (हलबीटोला), ता. जि. गोंदिया येथे करण्यात आले आहे. या ट्रायल्सचे विशेष आकर्षण म्हणजे माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व डीपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष प्रशांत वैद्य, माजी बीसीसीआय सिलेक्शन कमिटी अध्यक्ष चेतन शर्मा तसेच माजी राष्ट्रीय निवडकर्ता सुब्रतो बॅनर्जी यांच्यासह व्हीसीएच्या सिनियर, ज्युनियर आणि महिला निवड समितीचे सदस्य उपस्थित राहून खेळाडूंचे निरीक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्ट झालेल्या खेळाडूंना पुढील अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग कॅम्पसाठी आमंत्रित करण्यात येणार असून त्यांना विशेष कोचिंग, फिटनेस मार्गदर्शन आणि अनुभवी क्रिकेट व्यावसायिकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आगामी व्हीपीएल सिझन-२ मध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा १ जून ते १५ जून २०२६ या दरम्यान होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.vidarbha cricket associations सहभागी खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात, विशेषतः पांढर्‍या क्रिकेट युनिफॉर्ममध्ये, तसेच वयाचा पुरावा सोबत घेऊन वेळेवर मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक खेळाडूंनी मुकेश बारई, राजू लिमये, नियाज शेख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोंदिया जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.