शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 90.54 टक्के
31 विद्यार्थ्यांनी पटकावले प्रावीण्य श्रेणीत स्थान
यवतमाळ,
Vivekananda School विशुद्ध विद्यालयद्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदादेखील उत्तम कामगिरी बजावली आहे. दहावीच्या परीक्षेला शाळेमधून 148 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 134 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण 90.54 टक्के आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी, 44 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 48 विद्यार्थी द्वितीय श्रेणी, तर अकरा विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले. पुष्कर शैलेश दुधे याने 93.60 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याखालोखाल वेदांत प्रकाश रोकडे 92.80, जीवन अश्विन पाटील 92.20, ओम अरविंद ढुमणे 90.80 तर रुद्रांश प्रवीण आजने 90.40 टक्के गुण मिळविले.
Vivekananda School त्याचप्रमाणे ईश्वरी मन्साराम सावलकर 88 टक्के, साहिल सतीश हरणे 87.60, अमृता मनोज जंगमवार 86.80, श्रेयांशी नरेंद्र सुंकावार 86.40, वेदांत जितेंद्र बंगाले 85.20, सार्थक सुभाष खोडे 84.80, कृष्णा ओमप्रकाश टाके 84.60, तुषार संदीप गवई 83.80, ईशांत संतोष निनगुरकर 83.60, अमन अतुल नाईक 83.40, हर्षाली संदीप गिरी 82.80, पवन संजय कुंटलवार 82.40, अदिती भृगराज मोरे 82.40, आराध्या तेजेंद्र शर्मा 81.60, तुषार प्रवीण उघडे 81.60, स्नेहा दिगंबर आडे 80.40 तर विक्रांती चमनलाल राठोड 80 टक्के या विद्यार्थ्यांचाही गुणवंतांमध्ये समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, उपाध्यक्ष डॉ. अखिलेश पेशवे, सचिव विजय कासलीकर, सहसचिव मीरा केळकर, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, संचालक सुषमा दाते व मनीषा साठे, मुख्याध्यापक विवेक अलोणी, पर्यवेक्षक विवेक कवठेकर, वर्गशिक्षक संतोष पवार, हेरंब पुंड, दिनेश गहरवार, सर्व शिक्षक व कर्मचाèयांनी अभिनंदन केले आहे.