'वर्धा' जिल्ह्याचा निकाल ठरला भारी, यशाच्या शिखरावर विद्यार्थ्यांची भरारी!

    दिनांक :08-May-2026
Total Views |
देवळी : सृजन स्कूलची तृषा काळे शहरातून प्रथम
Wardha district results दहावीचा निकाल जाहीर झाला असून येथील सृजन कॉन्व्हेंटचा निकाल १०० टके लागला येथील तृषा काळे हिने ९६.४० टके गुण मिळवीत शहरातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. घनश्याम चोरे याने ९३.०० टके गुण मिळवीत शहरातून तिसरा क्रमांक मिळविला. गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टके लागला असून वैदेही भांगे हिने ९२.०० टके गुण प्राप्त करीत शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
 

adb 
 
जनता माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.१३ टके लागला असून कृष्णाई गोमासे हिने ९४.२० टके गुण प्राप्त करीत देवळी शहरातून द्वितीय व शाळेतून प्रथम आली. संचिता बुटले हिने ९१.४० टके गुण मिळवित द्वितीय स्थानी राहिली. मारिया इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टके लागला. यशवंत कन्या विद्यालय ८८.८८, नगरपरिषद हायस्कूलच्या निकाल ७५.९६, राजीव गांधी विद्यालयाचा निकाल ६३.६३ टके लागला.
समुद्रपूर तालुयातून नेहा धोबे प्रथम
समुद्रपूर ः इयत्ता दहावीचा निकाल तालुयाचा ८०.७८ टके लागला असून १०२४ पैकी ८२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर, गुरुकूल कॉन्व्हेंट मांडगाव, ज्ञानज्योती इंग्लिश स्कूल, वासी व विकास विद्यालय मांडगावचा १०० टके निकाल लागला. संस्कार ज्ञानपीठची नेहा धोबे हिने ९५. ४० टके गुण घेत तालुयातून प्रथम आली. तृषिका चौधरी ९५.०० टके घेत द्वितीय तर अनुष्का महाजन हिने ९४.२० टके गुण घेत तृतीय आली.
 
भरत ज्ञान मंदिरम् मधून कशिश केळवटकर प्रथम
वर्धा : स्थानिक भरत ज्ञान मंदिरम शाळेचा निकाल १०० टके लागला. मुलींनी बाजी मारली असून कशिश केळवटकर हिने ९५.८० टके गुण घेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. धनश्री धरवार ९५.२० द्वितीय आणि श्लोक पांडे हिने ९३.४० गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माधव पंडित, कार्यवाह अ‍ॅड. संध्या पुरेकर, उपाध्यक्ष मकरंद पाठक, प्राचार्य मोनाली सालोडकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.
आर. के. हायस्कूलचा निकाल अव्वल
पुलगाव, येथील आर. के. हायस्कूलचा निकाल उत्कृष्ट लागला. यश गजभिये याने ९७.२० टके गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला. अक्षरा सावळकर ९६.५० द्वितीय आणि राशी मोहतुरे हिने ९५.०० टके गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर आर. के. ज्ञान मंदिरममध्ये मनीष पिंपळकर ९५.००, प्रीती मोहतुरे ९३.६०, श्रावणी वाघ ९१.००, समृद्धी वैद्य ९०.४०, मोहिनी बेलोरकर हिने ९०.४० टके गुण प्राप्त केले. रंगलाल केजडीवाल हायस्कूलने अनेक वर्षांच्या परीक्षा निकालाच्या परंपरा कायम ठेवली. रंगलाल केजडीवाल संस्थेचे अध्यक्ष हरिप्रसाद केजडीवाल आणि शाळा समितीचे अध्यक्ष रंजन बाबू केजडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची विेेशेष प्रगती सुरू आहे. रंजन बाबू केजडीवाल यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
 
न्यू इंग्लिश हायस्कूलमधून मनस्वी ठाकरे प्रथम
वर्धा ः स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९४.१० टके लागला आहे. मनस्वी ठाकरे हिने ९४.६० टके गुण घेत शाळेतून प्रथम आली. साची गायगोले ९४.४० द्वितीय आणि प्रणव पवार हिने ९२.६० टके गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विजय जुगनाके, उपमुख्याध्यापक अजय येते, पुष्पा फरकाडे, शिक्षक राजेश बडगुजर, नीलिमा काळे यांनी अभिनंदन केले आहे.
केसरीमल कन्या शाळेतून श्रुती खिरडकर प्रथम
वर्धा ः स्थानिक केसरीमल कन्या शाळेचा निकाल ९५.९१ टके लागला असून श्रुती खिरडकर हिने ९५.२० टके गुण घेत शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला. वृषाली वाढई ८९.४० द्वितीय, चहात पेटकर याने ८६.४० टके गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
एसएसएम विद्यालयातून पूर्वांशु प्रथम
हिंगणघाट ः Wardha district results स्थानिक एस. एस. एम. विद्यालयाचा दहावीचा निकाल ९१. ८६ टके लागला. पूर्वाशु धकाते याने ९२.८० टके गुण घेत शाळेतून प्रथम आला. हर्षदा चहांदकर ८८.६०, कनिका मेहरा ८७.४०, आदर्श काळे ८५.२० आणि वेदांती देशमुख हिने ८५ टके गुण प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गो. गो. राठी, उपाध्यक्ष श्या. भा. भीमनवार, सचिव र. गं. धारकर, मुख्याध्यापक रा. ता कारवटकर आदींनी अभिनंदन केले.
संजय गांधी उर्दू विद्यालयाचा १०० टके निकाल
हिंगणघाट ः संजय गांधी स्मृती विद्या मंदिर उर्दू माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टके लागला. शेख माहिम नूर या विद्यार्थिनीने ८७ टके गुण घेत शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका कल्पना राजा सिंग, शिक्षक नियाजुद्दीन सिद्दीकी, नवेदुत्सर सिद्दीकी, शाहेदा मोहीज हुसैन आदींना दिले.
अमेयला व्हायचेय अभियंता
आर्वी ः येथील कृषक इंग्लिश विद्यालयाचा विद्यार्थी अमेय देशमुख याने ९८. ४० टके गुण प्राप्त करून तालुयातून प्रथम आणि जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नियमित अभ्यास व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच यश प्राप्त केल्याचे त्याने सांगितले. अमेयला संगीताची व खेळाची आवड आहे. पुढे अभियांत्रिकी शाखेकडे जाण्याचा त्याचा मानस आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका प्रणिता हिवसे, विजय डोळस व आईवडिलांना दिले.
सुशील हिम्मसिंगका विद्यालयातून पलक बन्सोड प्रथम
वर्धा ः स्थानिक सुशील हिम्मतसिंग का विद्यालयाचा निकाल ९९.४१ टके लागली. विद्यालयातून पलक बन्सोड हिने ९२.६० टके गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. अवनी भातकुलकर ९१.८०, आदर्श नेहारे ९१.८०, श्रुतिका मोहदुरे ९१.००, ज्ञानेश्वरी गिरडकर ९०.६० आणि श्रावणी गुल्हाने हिने ९० टके गुण प्राप्त केले.