वाशीम जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८४.०४ टक्के

    दिनांक :08-May-2026
Total Views |
वाशीम,
washim districts 10th result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल आज, ८ मे रोजी दुपारी जाहीर केला असून, त्यामध्ये वाशीम जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८८.०४ एवढी आहे. नेहमी प्रमाणे निकालात मुलींचीच आघाडी असून, एकूण ५८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
 
 


वाशीम निकाल  
 
 
इयत्ता दहावी च्या परीक्षेसाठी वाशीम जिल्ह्यातून १९६५८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १९४७० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात एकूण १७१४३विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ११०१७ मुले तर ८४५३ मुलींचा समावेश आहे. जाहीर झालेल्या निकालानानुसार ४४५० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ६००२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४९७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १७१५ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.९४९ तर मुलींची ९६.०९ टक्के आहे. वाशीम जिल्ह्यातून एकूण १९६५८ विद्यार्थ्यांनी प्रविष्ट झाले होते. त्यापकी १९४७० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यामध्ये मुलांची संख्या ११०१७ तर मुलींची संख्या ८४५३ एवढी होती. दहावीच्या निकालात रिसोड तालुका अव्वलस्थानी असून, त्याची टक्केवारी ९२.७५ एवढी आहे. कारंजा तालुका ९०.७९ टक्के, मंगरुळनाथ तालुका ८५.१४, वाशीम तालुका ८७.५७ टक्के, मालेगाव तालुका ८७.४१ टक्के, मानोरा तालुका ७९.२२ टक्के निकाल लागला आहे. वाशीम तालुयातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, कारंजा तालुका १८, मालेगाव तालुका ८, रिसोड तालुका ८, मंगरुळनाथ तालुका ८ तर मानोरा तालुयातील ६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. .
 
वाशीम ताालुक्यातून ४८७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४८२९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी ४२२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये प्राविण्य श्रेणीत १५०६, प्रथम श्रेणीत १३५८, द्वितीय श्रेणीत १०२० तर पास श्रेणीत ३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मालेगाव तालुक्यातून २४३२ विद्यार्थी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी २४०८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात २१०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीत ३७८, प्रथम श्रेणीत ७९९, द्वितीय श्रेणीत ७००, पास श्रेणीत २२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातून ४३२६ विद्यार्थी परिक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४२८० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली तर ३९७० विद्यार्थी पास झाले. त्यामध्ये प्राविण्य श्रेणीत १०६३, प्रथम श्रेणीत १५६५, द्वितीय श्रेणीत १०२७, पास श्रेणीत ३१५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कारंजा ताालुक्यातून ३३१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ३३०४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली.washim districts 10th result त्यात ३००० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीत ७७१, प्रथम श्रेणीत १०३०, द्वितीय श्रेणीत ९४१, पास श्रेणीत २५८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंगरुळनाथ तालुक्यातून २६६६ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २६३२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात २२४१ विद्यार्थी पास झाले. त्यामध्ये प्राविण्य श्रेणीत ५५८, प्रथम श्रेणीत ७७६, द्वितीय श्रेणीत ६६४, पास श्रेणीत २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मानोरा तालुक्यातून २०४६ विद्यार्थी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २०१७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी १५९८ विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामध्ये प्राविण्य श्रेणीत १७४, प्रथम श्रेणीत ४७४, द्वितीय श्रेणीत ६२४, पास श्रेणीत ३२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.