केरळचा मुख्यमंत्री कोण? काँग्रेसच्या 'या' ३ नेत्यांमध्ये चुरस

    दिनांक :08-May-2026
Total Views |
​नवी दिल्ली,
Who will be the Chief Minister of Kerala केरळमधील काँग्रेसच्या संभाव्य नेतृत्वाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून पक्षाच्या निरीक्षकांनी आपला सविस्तर अहवाल शुक्रवारी दुपारी १२ वाजता मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात राज्यातील आमदारांशी केलेल्या वैयक्तिक चर्चेचा आणि त्यांच्या कलचा समावेश करण्यात आला आहे.

 Chief Minister of Kerala
​सध्या या शर्यतीत के.सी. वेणुगोपाल यांचे नाव सर्वात आघाडीवर असून त्यांना तब्बल ४० ते ४३ आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, ते राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू सल्लागार असल्याने त्यांना राज्याच्या राजकारणात पाठवायचे की राष्ट्रीय जबाबदारीत कायम ठेवायचे, याबाबत हायकमांडसमोर पेच निर्माण झाला आहे. Who will be the Chief Minister of Kerala जर वेणुगोपाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही, तर रमेश चेन्नीथला हा दुसरा सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे, ज्यांना २० हून अधिक आमदारांचे समर्थन लाभले आहे.
​दुसरीकडे, व्ही.डी. सतीशन यांच्या नावाला युडीएफमधील मित्रपक्षांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम आणि तळागाळातील पकड लक्षात घेता आययूएमएल आणि केरळ काँग्रेससारख्या मित्रपक्षांनी सतीशन यांच्या नावाला पसंती दिली आहे. Who will be the Chief Minister of Kerala मित्रपक्षांच्या मते, मुख्यमंत्री हा विधानसभेचाच सदस्य असावा, जो निकष सतीशन पूर्ण करतात. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड नेमकी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.