‘यवतमाळ भूषण’ पुरस्कार डॉ. निखिलेश नलोडे यांना संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार

    दिनांक :08-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
'Yavatmal Bhushan' Award Dr. Nikhilesh Nalode समर्थ संगीत संस्था संस्था व कलासाधना बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच क्रीडा व खेळ विभाग यांच्या सहकार्याने दिल्या जाणारा ‘यवतमाळ भूषण 2026’ हा पुरस्कार डॉ. निखिलेश नलोडे यांना बहाल करण्यात आला. डॉ. नलोडे हे नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय संगीत विभागात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून संगीत विषयात ‘कव्वाली’ विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली आहे. डॉ. निखिलेश नलोडे यांच्या तालमीत तयार झालेले अनेक विद्यार्थी आज संगीत क्षेत्रात नाव मोठे करीत आहेत. मागील 20 वर्षांपासून त्यांनी अनेक विद्यार्थी संगीत क्षेत्रामध्ये घडविले आहेत.
 
 
bhushan
 
'Yavatmal Bhushan' Award Dr. Nikhilesh Nalode त्यांनी दूरचित्रवाणीवरील अनेक संगीत मालिकांमधून कलेचे प्रदर्शन केले आहे. त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’, ‘अथेल्लो’, मानुसभर जागा ताम्सोमा यांसारख्या अनेक नाटकांना संगीत दिले आहे. त्यांनी चाल लावलेल्या अनेक गीतांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. निखिलेश नलोडे अनेक वर्षांपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव निवड समिती सदस्यपदी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणात यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 40 वर्षांत पहिल्यांदाच मध्यविभाग युवा महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. या पुरस्काराबद्दल डॉ. निखिलेश नलोडे यांचे यवतमाळ जिल्हा विकास समिती अध्यक्ष जगदीश वाधवाणी, प्राचार्य डॉ. जयंत चतुर यांनी कौतुक केले. तसेच यवतमाळातील संगीत क्षेत्रातील कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.