सेलू,
agriculture office येथील तालुका कृषी कार्यालयात ‘तुझे माझे जमेना’चा प्रत्यय येत असून याचा फटका शेतकर्यांना बसताना दिसत आहे. कृषी कार्यालयात शेतकर्यांसाठी शासनाच्या भरीव योजना असून या कार्यालयात शेतकरी आल्यानंतर शेतकर्यांच्या भावना समजून घेण्यास तालुका कृषी अधिकार्यांना वेळ नसतो. त्यामुळे शेतकर्यांना ताटकळत बसावे लागत आहे. शासनाचा कृषीविषयी असलेल्या योजनाच्या माहितीसाठी शेतकरी तेथील अधिकार्यांकडे गेल्यानंतर ती माहिती टेबलवरून घेण्याचे सांगितले जाते.
पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे कित्येक प्रकरण पेंडिंग असल्याने येथे उन्हातान्हात शेतकरी कार्यालयात येतात, पण कधी-कधी तालुका कृषी अधिकारी या शेतकर्यांचे म्हणणे ऐकूण घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. अश्यावेळी शेतकर्यांना निराश होऊन परतावे लागते. अशा निराश झालेल्या बहुतांश शेतकर्यांची गर्दी तहसील कार्यालयात होत आहे. तहसील कार्यालयातून शेतकर्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होत असला तरी शेवटी कृषी विभागात जाण्याची वेळ येत आहे.
खरीप हंगामाला काही दिवस शिल्कक असताना कुठेही मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही. मात्र, कुणीही तालुका कृषी अधिकार्यांना भेटले तर त्यांना येथील कर्मचार्यांविषयी तक्रारीचा पाढाच ऐकावा लागतो, असे या कार्यालयात पहिल्यांदाच होत असल्याने नवल वाटत आहे.agriculture office त्यामुळे तालुका कृषी अधिकारी व मंडळ, पर्यवेक्षक, कृषिसहाय्यक यांच्यात एकसूत्रता नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, यात शेतकरी होरपळत असल्याचे बोलल्या जात आहे.