प्रशिक्षणातून चांगला कार्यकर्ता तयार व्हावा : अतुल मोघे

वर्धेत रा. स्व. संघाचा विदर्भ प्रांत प्रथमवर्ष प्रशिक्षण वर्ग सुरू

    दिनांक :09-May-2026
Total Views |
वर्धा
Wardha RSS News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वर्षांचा कार्यकाळ छोटा नाही. समाजाने आता हे संघटन स्वीकारले आहे. संघटनेचे धोरण, कार्यक्रमाला आपलंस केलं आहे. सहयोग देणे सुरू केले आहे. जगात फार कमी संघटन १०० वर्षे टिकले. काही तर टिकलेच नाहीत. आता संघाच्या उद्दीष्टांना समाजाने स्वीकारले आहे. परिवर्तन होते आहे. आता समाजाभिमुख संघ होणे आवश्यक आहे. डॉ. हेडगेवार यांना हिंदू समाजाचं हिंदू म्हणून संघटन करायचं होतं. तेच काम शाखांच्या माध्यमातून सुरू आहे. शाखा चालवण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणातून चांगला कार्यकर्ता तयार व्हावा, अशी अपेक्षा प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी व्यक्त केली.
 
RSS Wardha
 
Wardha RSS News स्थानिक नागठाणा येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात ८ ते २४ मे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ प्रांताच्या वतीने ‘संघ शिक्षावर्ग (सामान्य) २०२६’ च्या आज ९ रोजी आयोजित उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी प्रांत सह संघ चालक श्रीधर गाडगे, वर्गाचे सर्वाधिकारी मनोहर सपकाळ यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणात विदर्भातील २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
Wardha RSS News मोघे पुढे म्हणाले की, जगात शांती मिळवायची असेल तर भारतीय तत्त्वज्ञान, चिंतनावर चालावे लागेल. विकासासाठी शांतता हवी आहे. आमच्या देशावर अनेक आक्रमणं झाली. आक्रमणाने विकास थांबला होता. चुकीच्या नीती  व्याप्त झाल्या. समाजातील विविधता भेद म्हणून पुढे आली. वैद्यकीय शास्त्राने आमचे रंग बदलले. मात्र, आमचे गुणधर्म एकच आहेत. हिंदूंची संस्कृती वसुधैव कुटुंबकम् आहे. परंतु, चांगला विचार ठेवला तर त्याचा जगावर परिणाम कधी असा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी मोठी शती उभी करावी लागेल. ती शक्ती म्हणजे भेद दूर करून विविधता एकत्र करावी लागेल. हिंदू एकत्र करण्यासाठीच डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली असल्याचे मोघे म्हणाले. राष्ट्र प्रथम म्हणून विचार पद्धती पोहोचवावी लागेल. संघाच्या लाखो स्वयंसेवकांची एक मोठी शक्ती उभी केली आहे. त्यामुळे सर्वत्र हिंदूत्त्वाचा बोलबाला आहे. परंतु, ही शक्ती प्रसंगानुरूप आहे. संघ व्यती निर्माणाचे काम करते. १०० वर्षे, ४-५ पिढ्यांनी हिंदुत्त्वाचा जागर केला आहे. Wardha RSS News आता हिंदुत्त्वाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. समाजाचं संघटन सकारात्मक सुरू आहे. हिंदुत्त्वाचा विचार करणारे सरकार बसवले आहे. पण, हे प्रासंगिक आहे. आता प्रासंगिक बदल नको, असेही ते म्हणाले. प्रशिक्षणातून संघाचा विचार घ्यावा. सुदृढ शरीरात सुदृढ मन राहतं. प्रशिक्षणादरम्यान जे जे काही शिकवले जाईल ते शाखा चालवण्याच्या दृष्टीनेच प्रशिक्षण दिले जाते. संघाचे काम एक प्रकारे नशा असल्याचेही अतुल मोघे म्हणाले.
Wardha RSS News या प्रथमवर्ग प्रशिक्षण शिबिरात वैचारिक सत्र, शारीरिक व्यायाम, नियुद्ध, बौद्धिक सत्र, संघटनात्मक मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांचा समावेश राहणार आहे. यावेळी वनवासी कल्याण आश्रमाला विदर्भ प्रांतातर्फे निधी समर्पित करण्यात आला.