बंगळुरूला फलंदाजांकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा

    दिनांक :09-May-2026
Total Views |
रायपूर
Indian Premier League 19 व्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात रविवारी येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान सामना खेळला जाणार आहे. सलग दोन सामन्यांमधील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी व आपल्या मोहिमेला पुन्हा रुळावर आणण्यासाठीआरसीबी संघाला, विशेषतः अव्वल फळीतील फलंदाजांना आपली शक्ती व कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.
 
hardik pandya 
Indian Premier League  आरसीबीने हंगामाच्या सुरुवातीलाच दमदार कामगिरी करीत झोकात सुरुवात केली होती; त्यांनी आपले पहिले चार सामने जिंकले होते आणि प्ले-ऑफमधील प्रवेश ही केवळ एक औपचारिकताच उरली आहे असे वाटत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. गतविजेत्या संघाने आपल्या मागील पाच सामन्यांपैकी तीन सामने गमावले आहेत, ज्यामुळे ते स्पर्धेच्या मध्यावर थोड्याशा संकटात सापडले आहेत.
Indian Premier League सध्या गुणतालिकेत तिसèया क्रमांकावर असलेला आणि 10 सामन्यांतून 12 गुण मिळवलेला बंगळुरू संघ बाद फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने अजूनही भक्कम स्थितीत आहे.
परंतु, स्पर्धेच्या निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत असताना आपल्या कामगिरीचा जोर थोडासा कमी झाला आहे, याची जाणीव बंगळुरूच्या या संघाला नक्कीच असेल.
Indian Premier League आरसीबीचे गुण राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांच्या गुणांशी (12 गुण) बरोबरीत आहेत; आणि शनिवारी जयपूरमध्ये होणाèया सामन्यानंतर राजस्थान किंवा गुजरात यापैकी एखादा संघ त्यांच्या पुढे निघून जाईल, त्यामुळे बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे.
Indian Premier League गुणतालिकेतील परिस्थितीच थोडी चिंताजनक आहे, पण त्या बाह्य घटकाशिवाय आरसीबीला आपल्या फलंदाजी गटाला पुन्हा लयीत आणण्याची गरज आहे.
Indian Premier League गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादच्या थोड्याशा चिकट खेळपट्टीवर, आरसीबीचे फलंदाज 155 धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत व लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा 9 धावांनी झालेला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसारचा पराभवसुद्धा दिसतो तितका चुरशीचा नव्हता.
Indian Premier League विजय मिळविण्यासाठी आरसीबीला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती, पण ते त्या आकड्याच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत.
Indian Premier League आता, बंगळुरूच्या फलंदाजांसमोर मुंबईचे आणखी प्रभावी गोलंदाजी आक्रमण आहे, यात जसप्रीत बुमराह, कॉर्बिन बॉश, ए. एम. गझनफर व विल जॅक्सचा समावेश आहे.
रायपूर हे आरसीबीचे निश्चित घरचे मैदान आहे व येथील खेळपट्टी त्यांच्यासाठी एक नवीन आव्हान आहे. या आठवड्याच्या शेवटी विजेत्या संघाला आपल्या फलंदाजांकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.