अन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाहताना भिमनवार परिवाराच्या डोळ्यात अश्रू

    दिनांक :09-May-2026
Total Views |
भास्करराव भिमनवार यांचे स्वप्न साकार केले
 
वर्धा : हिंगणघाट येथील Bhaskarrao Bhimanwar  भास्करराव भिमनवार यांनीघरावर तुळशीपत्र ठेवत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. आज त्याचे फळ मिळाले आहे. आम्ही त्यांना विचारायचो यातून तुम्हाला काय मिळत तर ते म्हणायचे मला नाही पण तुमच्या पिढीला नक्कीच बंगालमध्ये परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळेल. आज बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पाहताना हिंगणघाट येथील भिमनवार परिवाराचे डोळे पाणावले होते.
 
 
Bhaskarrao Bhimanwar
 
हिंगणघाट येथील Bhaskarrao Bhimanwar भास्करराव भिमनवार जवळपास २ वर्ष कलकत्ता येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. १९४७ मधे वयाच्या २१ व्या वर्षी ते कलकत्ता येथे प्रचारक गेले होते. तिथे संघ स्वयंसेवक कालिदास बसू ह्यांचे घरी राहून त्यांनी संघ प्रचाराचे काम केले.घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ते हिंगणघाट येथे वापस आले आणि भारत कन्या शाळेत नोकरी सुरू केली. तदनंतर अनेक वर्ष तेथील स्वयंसेवकांना सोबत त्यांचा पत्रव्यवहार सुरू होता. ते प्रचंड आशावादी होते. ते नेहमी आम्हाला म्हणत आमच्या हयातीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार कदाचित येणार नाही. परंतु, त् पुढची पिढी निश्चित पणे आपले सरकार पश्चिम बंगाल मध्ये पाहिलं. आज त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे आम्हाला समाधान असल्याचे वर्धा नागरी बँकेचे संचालक व भास्करराव भिमनवार यांचे चिरंजीव श्याम भीमानवार यांनी सांगितले. पश्चिम बंगाल विषयी आमचे वडील प्रचंड आशावादी होते. तेथे हिंदुत्ववादी विचार रुजवण्यासाठी प्रयत्न केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये आमच्या विचाराचे सरकार बसवलेले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शामाप्रसाद मुखर्जी यांच्या सहकाऱ्याचा केलेला सत्कार हा त्यावेळी ज्या ज्या स्वयंसेवकांनी पश्चिम बंगाल मध्ये काम केले त्यांचा सत्कार असल्याचेही ते म्हणाले.