41 लाख 60 हजारांच्या मुद्देमालासह 3 आरोपी अटक
राळेगाव,
Cattle smuggling कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक पोलिसांनी अडवून 58 गोवंशीय बैलांची सुटका केली. पोलिसांनी गोवंशासह 41 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींना अटक केली. ही कारवाई वडकी पोलिसांनी गुरुवार, 7 मे रोजी पहाटे 5 च्या दरम्यान खैरी शिवारात केली. ट्रक क्रमांक एचआर69 सी9634 मध्ये वणी माजरी येथून कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असताना त्या ट्रकच्या मागे पोलिस आणि गोरक्षक लागले होते. मात्र चालक कंटेनर थांबवत नव्हता. ही माहिती गोरक्षक व वरोरा पोलिसांनी वडकी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी खैरी शिवारात पुलाजवळ ट्रक आडवा लावून वाहतूक ठप्प केली.
Cattle smuggling तेव्हा मिळालेल्या माहितीप्रमाणे ट्रक समोरून येताना दिसला. पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली. पोलिसांना त्यात 58 गोवंशीय बैल दोरखंडाने बांधलेले दिसले. ट्रकमधील झनकलाल हृदयसिंग मरकाम (वय 37 नागपूर), मंजूरखान जमीलखान पठाण (वय 42 नागपूर) व अब्दुल सोहेब अब्दुल अलीम (वय 36 नागपूर) यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून 58 गोवंश प्रत्येकी 20 हजार प्रमाणे 11 लाख 60 हजार रुपये व वाहन 30 लाख रुपये असा एकूण 41 लाख 60 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुखदेव भोरकडे, उपनिरीक्षक सुनील कुडमेथे, अंमलदार अमोल चौधरी, भोजराज करपते, अभिजित कोषटवार, अंकुश पाथोडे यांनी केली.