भारतीय किसान संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पारवा,
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी सरसकट हेक्टरी 17 हजार रुपये Crop insurance compensation पीकविमा नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. या संदर्भात गुरुवार, 7 मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. 2026 च्या खरीप हंगामात जुलै ते सप्टेंबरदरम्यान राज्यातील सुमारे 2047 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरे, घरे तसेच काही ठिकाणी जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सुमारे 32 हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले होते.
Crop insurance compensation या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 35,500 रुपये मदत जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात एनडीआरएफ निकषांनुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना 8,500 रुपये देण्यात आले. तसेच दुसऱ्या टप्प्यात रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10 हजार रुपये (कमाल 3 हेक्टरपर्यंत) मदत वितरित करण्यात आली आहे. मात्र, जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रुपये विमा कंपन्यांकडून देण्यात येत नसल्याचा आरोप संघाने केला आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या संबंधित कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना विजय धानोरकर, अविनाश क्षीरसागर, जयवर्धन यल्टीवार, वैभव यल्टीवार, विनोद खोडे, अमोल वानखेडे, आकाश नालमवार, राकेश बद्दमवार, सुनील पेटलवार, स्वामी यल्टीवार व भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत युवा प्रमुख राम जिल्लडवार उपस्थित होते.