राजकारणाला दिलजीतचा नकार

    दिनांक :09-May-2026
Total Views |
मुंबई,
Diljit's rejection of politics पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या राजकारणात प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्याने स्वतः पूर्णविराम दिला आहे. पंजाबच्या राजकारणात नवीन चेहरा म्हणून त्याचे नाव पुढे येत असताना दिलजीतने स्पष्ट शब्दांत सांगितले की त्याला राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही. आपल्या कामात तो पूर्णपणे समाधानी असून लोकांचे मनोरंजन करत राहणे हेच त्याचे ध्येय असल्याचे त्याने म्हटले आहे.
 
 
 
दिलजीत दोसांझ
अलीकडेच एका पंजाबी वृत्तपत्रात दिलजीत पंजाबच्या राजकारणात प्रवेश करू शकतो का, यावर एक विशेष लेख प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर विविध स्तरांतून त्याच्याबाबत चर्चा सुरू झाली. काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्याने राजकारणात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. जागतिक स्तरावर पंजाबचे नाव पोहोचवणारा कलाकार म्हणून दिलजीतकडे पाहिले जात असल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले होते.