इकॉनॉमी क्लासचे भाडे आता ३४ हजार रुपये
नागपूर,
Flights to Doha डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कतारमधील दोहा शहरासाठी थेट विमानसेवा २१ मेपासून पुन्हा सुरू होत आहे. मात्र, तिकीट भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हवाई सफरीचा हा आनंद म्हणजे बोर दाखवून काढण्यासारखा प्रकार ठरला आहे. आखाती युद्ध आणि वाढलेल्या कतार तणावामुळे २७ फेब्रुवारीनंतर दोहा-नागपूर-दोहादरम्यान एअरवेजची थेट उड्डाण सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तब्बल २ महिने २१ दिवसांनंतर कतार एअरवेजचे विमान पुन्हा नागपुरात दाखल होणार आहे.
भाड्यात जवळपास ४१ टक्के वाढ
मुख्यत: दोहाहून नागपुरात येणार्या फ्लाइटच्या क्लासचे भाडे आता ३४ हजार रुपयांपासून आहे. इराण युद्धापूर्वी हेच भाडे सुमारे २४ हजार रुपये होते. म्हणजेच भाड्यात जवळपास ४१ टक्के वाढ झाली आहे. तर बिझनेस क्लासचे भाडे १ लाख रुपयांवर पोहोचले असून, पूर्वी ते सुमारे ६५ हजार रुपयांपासून सुरू होत होते. या श्रेणीत ५४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली तर नागपूरहून दोहाला जाणार्या प्रवाशांसाठी इकॉनॉमी भाडे २३ हजार रुपयांपासून सुरू होत आहे. बिझनेस क्लासमधील प्रवाशांना पूर्वीचे भाडे ६५ हजार रुपयांपासून सुरू होत होते. ते आता १ लाख २२ हजार रुपयांपर्यंत गेले आहे.
आता परिस्थितीत सुधारणा
Flights to Doha इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कतार एअरवेजने सेवा बंद केली सुरुवातीला ही सेवा मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता कतार एअरवेजने दोहाहून नागपुरासाठी २० मेपासून आणि नागपूरहून दोहासाठी २१ मेपासून सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
फ्लाइटच्या वेळेत थोडा बदल
समर शेड्यूलमध्ये प्रथमच दोहा-नागपूर-दोहा फ्लाइटच्या वेळेत थोडा बदल करण्यात आहे. यापूर्वी ही फ्लाइट रात्री २.२० वाजता नागपूर विमानतळावर उतरायची, आता ती रात्री २:४५ वाजता येणार आहे. त्याचप्रमाणे नागपूरहून दोहाकडे जाणारी फ्लाइट पूर्वी पहाटे ३:५० वाजता रवाना व्हायची, ती आता पहाटे ४:१५ वाजता रवाना होईल. पूर्वीप्रमाणेच ही विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस उपलब्ध राहणार आहे.