चीनमध्ये माजी मंत्र्यांना फाशीची शिक्षा

    दिनांक :09-May-2026
Total Views |
बीजिंग,
Former ministers sentenced to death in China चीनमध्ये भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला आणखी धार देत दोन माजी संरक्षण मंत्र्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. चीनच्या न्यायालयाने वेई फेंगहे आणि ली शांगफू या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने देशात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोघेही दोषी आढळले आहेत.चिनी सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वेई फेंगहे यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर ली शांगफू यांच्यावर लाच घेणे आणि लाच देणे असे दोन्ही आरोप सिद्ध झाले. त्यानंतर न्यायालयाने दोघांविरोधात कठोर निर्णय देत मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली.
 

एडरर  
 
वेई फेंगहे यांनी २०१८ ते २०२३ या कालावधीत संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नंतर ली शांगफू यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. मात्र काही काळातच त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, हे दोन्ही नेते शी जिनपिंग यांच्या विश्वासातील मानले जात होते आणि केंद्रीय लष्करी आयोगातही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.दोघेही एरोस्पेस अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित होते आणि चीनच्या क्षेपणास्त्र दलाच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये त्यांच्यावर कोणतीही मवाळ भूमिका न घेता कठोर शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे शी जिनपिंग भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करत नसल्याचा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. २०१२ मध्ये सत्तेवर आल्यानंतर शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराविरोधात व्यापक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रभावशाली नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्याचे सांगितले जाते.