ॲक्युसॅट बैठकीत इन्क्रिमेंटबाबत महत्त्वाची चर्चा

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नागपूर,
Accusat meeting असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲन्युएटेड टिचर्स (ॲक्युसॅट)च्या नागपूर विभागीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत २००६ पासून निवृत्त झालेल्या प्राध्यापक आणि प्राचार्यांना एक अतिरिक्त इन्क्रिमेंट मिळण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेत असे नमूद करण्यात आले की, जे प्राध्यापक किंवा प्राचार्य शेवटचे इन्क्रिमेंट घेतल्यानंतर किमान सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ सेवेत होते आणि त्यानंतर निवृत्त झाले आहेत, त्यांना एक अतिरिक्त इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधितांनी आपले प्रस्ताव ॲक्युसॅट संस्थेकडे सादर करावेत, असेही बैठकीत सांगण्यात आले.
 
Accusat meeting
 
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे होते. तसेच ॲक्युसॅटचे मार्गदर्शक प्राचार्य प्रभुजी देशपांडे उपस्थित होते. कार्यकारिणीचे सहसचिव प्राचार्य डॉ. अशोक काळे, सदस्य प्राचार्य डॉ. नरेंद्र दीक्षित, प्राचार्य डॉ. पांडुरंग बाळबुधे आणि प्रा. डॉ. रत्नाकर लांजेवार यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला सचिव डॉ. पुष्पा तायडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. Accusat meeting सर्व सदस्यांनी विषयावर आपापली मते मांडली. अध्यक्ष डॉ. अरविंद शेंडे यांनी या प्रकरणात कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास अतिरिक्त इन्क्रिमेंट मिळवता येऊ शकते, असे मत व्यक्त केले. शेवटी प्रा. डॉ. रत्नाकर लांजेवार यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठक संपन्न झाली. अशी माहिती सचिव डॉ. पुष्पा तायडे यांनी दिली.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र