हिंगणघाटात ९.३० लाखाची एमडी जप्त; बिश्नोइ गँगमधील महिलेसह दोघांना अटक

बुटीबोरी येथे छापा मारीत रॅकेटचा पर्दाफाश

    दिनांक :09-May-2026
Total Views |
हिंगणघाट,
hinganghat crime येथील पोलिसांनी कारवाई करत तब्बल ९ लाख ३० हजार ३०० रुपयांचे अमली पदार्थ (एमडी) जप्त केले. या प्रकरणी राजस्थानातील एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस इतर आरोपींच्या शोधात राजस्थानकडे रवाना झाल्याची माहिती आहे. ही कारवाई ७ रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयात हजर केले असता १४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 

hinganghat crime 
 
 
दरम्यान, पोलिस कोठडीतील हिंगणघाट येथील यश श्रावणे(२१) याच्याकडून जप्त करण्यात आलेला एमडी अंमली पदार्थ हा बुट्टीबोरी येथील बिश्नोई नावाच्या इसमाकडून खरेदी करून आणल्याची माहिती दिली. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाले. त्या आधारावर पोलिसांनी कारवाई करून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले.hinganghat crime चौकशी दरम्यान बुटीबोरी येथील बिश्नोईचे नाव सांगण्यात आले. पोलिसांनी तो धागा पकडून ७ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे छापा टाकून कैलास बिश्नोई (२८) मूळ रा. करना, ता. सिंदरी, जिल्हा बालोत्रा, राजस्थान, ह.मु. बुटीबोरी तसेच सुमादेवी ओमप्रकाश बिश्नोई (३०) मूळ रा. राजीव नगर, तह. सान्सोर, जिल्हा जालोर, राजस्थान, ह.मु. बुटीबोरी यांना ताब्यात घेतले. यश श्रावणे याने कैलास बिश्नोई याच्याकडूनच एमडी अंमली पदार्थ खरेदी केल्याची ओळख पटवून दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. घरझडतीदरम्यान प्लास्टिक पिशवीमध्ये मॅफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ पावडर मिळून आली. या अंमली पदार्थाचे वजन २६५.८ ग्रॅम असून त्याची किंमत ९ लाख ३० हजार ३०० रुपये आहे. पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहित साठे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहेत.