नागपूर,
New English High School नागपूर येथील काँग्रेस नगर परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून शाळेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आर्या मोहन नेवारे हिने ९४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अक्षरा युवराज राजनकर हिने ९०.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर स्मित संदीप चाटे याने ८७.६० टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळविले. New English High School तसेच पियुष बलचंद गायधने याने ८५.६० टक्के आणि जानवी गणेश जाधव हिने ८४.२० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. संस्थेचे कार्यवाह, सहकार्यवाह, प्राचार्य, पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. New English High School शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सौजन्य: चंद्रशेखर इंगळे, संपर्क मित्र