वणीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी

    दिनांक :09-May-2026
Total Views |
चार आरोपींवर कारवाई
7 हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

वणी, 
Police raid gambling dens शहरातील लालगुडा चौफुली परिसर व ज्योती बार गल्ली परिसरात लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर वणी पोलिसांनी धाड टाकून चार आरोपींवर जुगार कायद्यांतर्गत कारवाई केली. ही कारवाई 24 एप्रिल व 8 मे रोजी करण्यात आली. या प्रकरणात गोपी किसन लोणारे (रामपुरा वार्ड), अमित किसन घेडांगे (भाग्यशाली नगर), मंगेश बबन बदखल (भालर) व अजय बलेश्वर मांझी (रंगनाथनगर) यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 7 हजार 160 रुपयांचा नगदी मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
gambling
 
Police raid gambling dens  वणी पोलिस प्रशासनाकडून शहरातील अवैध धंद्यांविरोधात सातत्याने माहिती संकलन करून विशेष पथकांच्या माध्यमातून कारवाया सुरू असल्याचे सांगण्यात आले. जुगार अड्डे व इतर बेकायदेशीर व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढील काळातही अधिक प्रभावी मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस ठाणेदारांनी दिली. तसेच नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.