पं. बच्छराज व्यास इंग्रजी माध्यमचे यश

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नागपूर,
Pt. Bachcharaj Vyas Vidyalaya महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी २०२५-२६ चा निकाल जाहीर झाला असून पंडित बच्छराज व्यास विद्यालय इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे.

rohini 
 
 
शाळेची विद्यार्थिनी तमन्ना गुप्ता हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पुण्या भोसले हिने ८९.९० टक्के गुणांसह द्वितीय, तर कारुण्य थूल याने ८९ टक्के गुण मिळवत तृतीय स्थान प्राप्त केले. शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.Pt. Bachcharaj Vyas Vidyalaya गुणवंत विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षिका रुचिरा गोरे, मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी अभिनंदन केले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचेही कौतुक करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष गजानन पिलपिले, सचिव उपेंद्र जोशी तसेच शाळेचे अध्यक्ष संजय शिरपूरकर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:रोहिणी जोशी,संपर्क मित्र