संवादातून विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नागपूर,
S. B. Jain Institute एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे “संवाद – एक मार्गदर्शन उपक्रम” अंतर्गत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
 
 
 
pravin
 
 
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून संजय अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “संवादातून समाधान” या विषयावर बोलताना त्यांनी प्रभावी संवाद, सकारात्मक विचार आणि परस्पर समज यांचे महत्त्व अधोरेखित केले. संवादाच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवून जबाबदारीने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.S. B. Jain Institute यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अग्रवाल तसेच प्राचार्य डॉ. एस. एल. बदजाते यांनी प्रमुख वक्त्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.कार्यक्रमाला डॉ. चंद्रकांत राठोड व डॉ. लक्ष्मी महंतरे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. सौरभ सिंह यांनी केले.महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र