108 जोडप्यांचा होणार थाटामाटात विवाह
यवतमाळ,
'samuhik vivah melava' येथील सतचिकित्सा प्रसारक मंडळ व श्री साईमयी ट्रस्टच्या वतीने रविवार, 10 मे रोजी सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल वेनिशियनमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता होणाऱ्या या महोत्सवात सर्वधर्मीय 108 जोडपे विवाह बंधनात अडकणार आहेत. आई-वडिलांनी मुलांच्या लग्नाकरिता कर्जबजारी होऊ नये. लग्नासाठी होणारा अवास्तव खर्च टाळावा, ही संकल्पना लक्षात घेऊन येथील सत्चिकित्सा प्रसारक मंडळाने 1994 मध्ये यवतमाळ येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह महोत्सवाची सुरुवात केली. तेव्हा तो भारतातील पहिला सामूहिक विवाह मेळावा होता. मागील 31 वर्षे सातत्याने हा सामुदायिक विवाह सोहळा होत आहे.
samuhik vivah melava' या महोत्सवात प्रमुख अतिथी बंगळुरूच्या हृदयस्पंदना साईमयी ट्रस्टचे द्वारकानाथ साई, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री संजय राठोड, हंसराज अहिर, मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके व खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पांडे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात विवाह करणाèया जोडप्यांना संसारोपयोगी भांडी, वरास शेरवानी, ड्रेस मटेरियल, मनगटी घड्याळ, बॅग इत्यादी भेटवस्तू व वधूस एक ग्रॅम सोन्यासह मंगळसूत्र भेट देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी आयोजन समिती अध्यक्ष डॉ. अशोक उईके, उपाध्यक्ष अजय मुंधडा, संयोजक डॉ. प्रकाश नंदुरकर व आयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.