नप अध्यक्षांकडून सावरगड कचरा डेपोची पाहणी

    दिनांक :09-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
Savargad Garbage Depot यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांच्याकडून शहरातील सावरगड येथील कचरा डेपोला शनिवार, 9 मे रोजी भेट देऊन पाहणी केली. भटक्या कुत्र्यांसाठी ‘शेल्टर होम’ तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी ही भेट दिली. नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
 
 
Savargad
 
Savargad Garbage Depot धूर व प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. यवतमाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.