रेल्वे स्थानकावरील वातानुकूलित प्रतीक्षालयातील घटना
नागपूर,
Senior railway passenger injured मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास स्टेशन’ कामांना वेग आला असताना वातानुकूलित प्रतीक्षालयात एका ज्येष्ठ प्रवाशाचा पाय शौचालयात अडकल्याची धक्कादायक घटना घडली. यात प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी रेल्वे कर्मचार्यांना शौचालयाचा काही भाग फोडावा लागला. गंभीर जखमी झालेल्या या प्रवाशावर किंग्जवे रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यास शनिवारी सुटी देण्यात आली.
Senior railway passenger injured नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर पुनर्विकास नव्याने वातानुकूलित प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास या प्रतीक्षालयातील शौचालयात विजयवाडा येथील कांतिपुडी वेंकट (वय ६३) हे गेल्यानंतर अचानक त्यांचा तोल गेला. पाय घसरल्याने त्यांचा एक पाय शौचालयाच्या खड्ड्यात अडकला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे कांतिपुडी वेंकट यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. त्यांच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला. वेळातच रेल्वे कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे कर्मचार्यांनी शौचालयाचा भाग काळजीपूर्वक तोडून कांतिपुडी वेंकट यांना बाहेर काढले. फरशी व काँक्रीटचा भाग तोडताना कांतिपुडी वेंकट यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने किंग्जवे रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.