प्राची गुप्ता मनपा हिंदी माध्यमातून प्रथम

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नागपूर,
Shri Lal Bahadur Shastri Hindi School महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या माध्यमिक शालांत परीक्षेत पी एम श्री लालबहादुर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल ९० टक्के लागला आहे.
 
 
madhuri
 
 
शाळेची विद्यार्थिनी प्राची ओमप्रकाश गुप्ता हिने ८९.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मनपा हिंदी माध्यमाच्या सर्व शाळांमधून ती प्रथम आली आहे.Shri Lal Bahadur Shastri Hindi School अत्यंत साधारण परिस्थितीतून प्राचीने मिळविलेले हे यश कौतुकास्पद मानले जात आहे. मनपाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय महापौरांच्या हस्ते करण्यात आला.
सौजन्य:माधुरी पाडळकर,संपर्क मित्र