वर्धा,
compensation approved farmers पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिकांसाठी जिल्ह्यातील ६२ हजार ६६४ शेतकर्यांनी पीक विमा नोंदणी केली होती. या शेतकर्यांपैकी सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या १५ हजार ३०५ शेतकर्यांना १२ कोटी १४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
योजनेंतर्गत खरीप व रबी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरित परिणाम करणार्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देण्यात येते. जर एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्यावर्षीचे दर हेटरी सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकर्यांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येते.
जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाकरिता २९ हजार ७८२, तूर पिकाकरिता ८ हजार ५३३, सोयाबीन पिकाकरिता २४ हजार १८२ व इतर पिकांकरिता १६७ असे ६२ हजार ६६४ शेतकर्यांनी विमा नोंदणी केली होती. जिल्ह्यात ५५ महसूल मंडळांपैकी ३७ महसूल मंडळातील शेतकर्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त १५ हजार ३०५ शेतकर्यांना १२ कोटी १४ लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला.
आर्वी तालुक्यातील ६ महसूल मंडळातील १४३७ शेतकरी, आष्टी तालुक्यातील १ महसूल मंडळ ३१० शेतकरी, देवळी तालुका ५ महसूल मंडळ ३५८५ शेतकरी, हिंगणघाट तालुका ७ महसूल मंडळ २९०८ शेतकरी, समुद्रपूर तालुका ७ महसूल मंडळ ३१२९ शेतकरी, सेलू तालुका ५ महसूल मंडळ २०४१ शेतकरी, वर्धा तालुक्यातील ६ महसूल मंडळातील १८९४ शेतकर्यांचा समावेश आहे. कारंजा व आष्टी तालुयातील प्रत्येकी २, वर्धा तालुयातील १ अशा ५ महसूल मंडळात सोयाबीन पिकाकरिता पीक विमा लागू झालेला नाही.compensation approved farmers उर्वरित १३ महसूल मंडळाची नुकसान भरपाई परिगणना सुरू आहे.
विमा संरक्षित रकम व विमा नोंदणी
गेल्या खरीप व रबी हंगामात विमा संरक्षित रकम कापूस ६० हजार, सोयाबीन ५७ हजार ५००, तूर ४४ हजार, उडित व मुंग २३ हजार, ज्वारी ३० हजार, गहू ४४ हजार, हरभरा ३६ हजार रुपये प्रति हेटरी संरक्षित रकम होती. कापूस पिकाकरिता २९ हजार ७८२, तूर ८ हजार ५३३, सोयाबीन २४ हजार १८२ व इतर पिकांकरिता १६७ अशा ६२ हजार ६६४ शेतकर्यांची विमा नोंदणी झालेली होती. तसेच रबी हंगामात हरभरा पिकाकरिता ५ हजार ५१० तर गहू पिकाकरिता २ हजार ६११ शेतकर्यांनी विमा नोंदणी केली होती.