गुणवंतांचे अभिनंदन करतानाच शिक्षकाचा मृत्यू

*जड अंतःकरणाने मुलींनी दिला वडिलांना मुखाग्नी

    दिनांक :09-May-2026
Total Views |
चंद्रपूर,
vinayak mahadev kale विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनीचे तिच्या घरी जाऊन अभिनंदन करताना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक विनायक महादेव काळे यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
 

vinayak mahadev kal 
 
 
विद्यार्थ्यांच्या यशात आनंद मानणारे विनायक काळे हे शुक्रवारी दहावीतील विशेष प्राविण्य प्राप्त लावण्या इंगोले हिच्या घरी अभिनंदनासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना अचानक भोवळ आली. उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.vinayak mahadev kale आयुष्यभर विद्यार्थ्यांना संस्कार, शिक्षण आणि आधार देणार्‍या सेवानिवृत्त शिक्षक विनायक काळे यांच्यावर शनिवारी अत्यंत भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
परंपरेला फाटा देत त्यांच्या दोन मुलींनी जड अंतःकरणाने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून उपस्थित ग्रामस्थ, शिक्षक व नातेवाईकांचे डोळे पाणावले. विनायक काळे यांच्या निधनाने विसापूर परिसरात शोककळा पसरली असून, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा संवेदनशील शिक्षक परीट, वरठी, धोबी समाजाचे विसापूरचे अध्यक्ष गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.