मुंबई,
The magic of Dhurandhar 2 continues अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ५१ दिवस उलटून गेले असले, तरी प्रेक्षकांमधील त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर तिकीटबारीवर जबरदस्त कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मागे टाकले आहेत. आता हा चित्रपट आमिर खानच्या ‘दंगल’च्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला असून, देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे.
१९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत तसेच परदेशातील चित्रपटगृहांमध्ये जोरदार प्रतिसाद मिळवला. आठव्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई सुरूच असून, नवीन चित्रपटांशी तो जोरदार स्पर्धा करताना दिसत आहे. तिकीट विक्रीत सातत्य राखण्यात चित्रपट यशस्वी ठरला असून प्रेक्षक अजूनही मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळताना दिसत आहेत.ताज्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर २’ने प्रदर्शनाच्या ५१ व्या दिवशी भारतात सुमारे ४२ लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे देशांतर्गत एकूण कमाई १,३६५ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. जागतिक स्तरावर चित्रपटाने १,७९२ कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून, ‘बाहुबली २’चा विक्रम मागे टाकत तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.