कमी होतेय् ‘ताजमहाल’ची ऐट!

वादळ-पावसात दगड तुटून पडताहेत भिंतींना तडे, रॉयल गेटचीही दुर्दशा

    दिनांक :09-May-2026
Total Views |
आग्रा
Taj Mahal  ताजमहालला सुमारे ३७३ वर्षे झाली आहेत. जगातील सर्वात सुंदर इमारतींपैकी एक असलेल्या या स्मारकाच्या रॉयल गेट (शाही दरवाजा) च्या दगडांना आता तडा पडण्यास सुरुवात झाली आहे. दरवाजाच्या भिंतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. काही दगड त्यांच्या जागेवरून सरकले आहेत.
 
taj mahal 
Taj Mahal  शाही गेट आता वादळ आणि पाऊसही सहन करू शकत नाहीये. गेल्या महिन्यात वादळी पाऊस आणि वाèयामुळे दोनदा गेटचे दगड तुटून खाली पडले आहेत. हे दगड मुघलकालीन आहेत.
Taj Mahal  यापूर्वीही ताजमहाल परिसरातील अनेक भागांतील दगड आणि जाळ्या तुटल्या आहेत. मुख्य कबरीच्या मागे यमुना नदीच्या दिशेने लावलेली जाळीदार रेलिंगही जोरदार पाऊस आणि वादळ सहन करू शकली नाही. सन २०२०  मध्ये ही रेलिंग कोसळली होती.
Taj Mahal  ७ एप्रिलला जोरदार वादळ आणि पाऊस झाला. यावेळी ताजमहालच्या रॉयल गेटचे पांढरे आणि लाल दगड निखळून पडले. सुदैवाने कोणताही पर्यटक याच्या तडाख्यात आला नाही. ३० एप्रिलला येथे हलके वादळ आणि पाऊस झाला. तरीही, रॉयल गेटचे कमकुवत झालेले दगड ते सहन करू शकले नाहीत. पांढऱ्या दगडाचे ५ तुकडे तुटून खाली पडले.
या घटना केवळ उदाहरणे आहेत. ताजमहालचे कर्मचारी सांगतात की, याव्यतिरिक्तही अनेक वेळा दगड आणि जाळ्या तुटून खाली पडल्या आहेत.
रॉयल गेटची दूरवस्था
Taj Mahal ताजमहालचा रॉयल गेट म्हणजेच शाही दरवाजा आता जीर्ण झाला आहे. अनेक ठिकाणचे दगड आपल्या जागेवरून सरकले आहेत. भिंतींना भेगा दिसू लागल्या आहेत. दगड इतके जुने झाले आहेत की ते भिंतीतून निखळून पडू लागले आहेत. लाल दगडाने बनवलेल्या रॉयल गेटमध्ये नक्षीकामासाठी लावलेले पांढरे आणि काळे दगडही निघत आहेत. अनेक ठिकाणी दगड गळल्यामुळे भिंतींमध्ये पोकळी (गॅप) तयार झाली आहे.