दहाविच्या विद्यार्थिनीसह दाेघींची आत्महत्या

    दिनांक :09-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
student commit suicide शहरात दाेन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. दहावीच्या विद्यार्थिनीने घरात गळास घेतला तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने उड्डाणपुलावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पाेलिसांनी नाेंद घेऊन तपास सुरु केला. सान्वी (15, सुरेंद्रनगर, बजाजनगर) आणि श्रीना आशीष गडपायले (वय 18, रा. कामठी मार्ग) अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत.
 
 
 
student commit suicide
 
 
पहिल्या घटनेत, श्रीना गडपायले ही कळमेश्वर येथील स्वामीनारायण इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये शिक्षण घेत हाेती. गुरुवारी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास श्रीनाने ‘द व्हाईट हाऊस’ समाेरील कामठी मार्ग फफ्लायओव्हरवरून उडी घेतली. घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या श्रीनाला उपस्थित नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच तिचे कुटुंबीय रुग्णालयात पाेहाेचले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रीनाचे वडील वाहतूक व्यवसायी असून त्यांच्या तक्रारीवरून पाचपावली पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समाेर आले नसून पाेलिस पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, सान्वी ही दहावीची विद्यार्थिनी हाेती.student commit suicide तिच्या आईवडिलांमध्य वाद सुरु असल्यामुळे दाेघेही वेगळे राहत हाेते. सान्वी ही आईकडे राहत हाेती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती वडिलांकडे राहायला गेली हाेती. बिल्डर असलेल्या वडिलांच्या घरात तिने गुरुवारी सिलिंग फॅनला गळास घेतला.घटना लक्षात येताच तिला लगेच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. या प्रकरणी बजाजनगर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.
.......