वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नागपूर ,
Vimal Complex Ghatroad महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा घाट रोड येथील विमल कॉम्प्लेक्समधील महासंघ कार्यालयात जिल्हाध्यक्ष त्रिलोचन खरबडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेला राज्य उपाध्यक्ष पी. एम. हरणे, महासचिव शंकर पहाडे, राज्य सचिव वनकर तसेच मधुकर महल्ले उपस्थित होते.

sks
 
 
 
सभेची सुरुवात धर्मराज पाटणे यांनी श्रमिक गीत सादर करून केली. प्रास्ताविकात महल्ले यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी संघ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. Vimal Complex Ghatroad वनकर यांनी नव्या कार्यकारिणीनंतर संघाच्या कामकाजाला वेग आल्याचे नमूद केले.प्रमुख पाहुणे पी. एम. हरणे यांनी यवतमाळमधील कामांचा आढावा मांडला. महासचिव शंकरराव पहाडे यांनी संघविस्तारासाठी उपाययोजना सांगत नागपूर येथील आक्रोश मोर्चा व छत्रपती संभाजीनगर बैठकीचा वृत्तांत सादर केला.अध्यक्षीय भाषण त्रिलोचन खरबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश सिंगार यांनी केले. सूत्रसंचालन धर्मराज पाटणे यांनी केले.
सौजन्य: शंकर पहाडे,संपर्क मित्र