वर्धा,
wardha crime दुचाकीच्या धडकेत एका श्वानाचा मृत्यू झाल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघांवर एका युवकाने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नाचनगाव परिसरातील आगरगाव चौफुली येथे घडली. या हल्ल्यात एक जण गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, परवेज उर्फ शहजाद शेख हबीब शेख (२२) हा ५ मे रोजी संध्याकाळी दुचाकी वेगाने चालवत होता.
दरम्यान, दुचाकीच्या धडकेत बजरंग रावेकर यांच्या घरासमोर एका श्वानाचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर मनोज चौहाण, बजरंग रावेकर आणि मंगेश गुल्हाणे हे तिघे परवेज शेखचा शोध घेण्यासाठी निघाले. परवेज आगरगाव चौफुली येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिघेही तेथे पोहोचले.wardha crime त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने शिवीगाळ सुरू केली. अचानक चाकू काढून हल्ला केला. यात मंगेश गुल्हाणे (३०) गंभीर जखमी तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेले मनोज चौहाण आणि बजरंग रावेकर हे दोघे किरकोळ जखमी झाले. झटापटीदरम्यान परवेजही खाली पडल्याने तोही जखमी झाला. मंगेशला पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने इतर रुग्णालयात हलविण्यात आले. मनोज चौहाण यांच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी लहानुजीनगर येथील परवेज उर्फ शहजाद शेख हबीब शेख (२२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे