नागपूर,
Wockhardt Hospitals येथे एका महिन्यात दोन गुंतागुंतीच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना नवजीवन मिळाले असून मध्य भारतातील प्रगत ट्रान्सप्लांट सेवेत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.या शस्त्रक्रियांमध्ये एक कॅडेव्हरिक (मृत दात्याकडून) आणि दुसरे जिवंत दात्याकडून मुलाकडून वडिलांना यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. दोन्ही शस्त्रक्रिया डॉ. स्वप्निल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीपणे पार पाडल्या.
पहिल्या प्रकरणात मृत व्यक्तीच्या अवयवदानातून यकृत प्रत्यारोपण करण्यात आले, तर दुसऱ्या प्रकरणात मुलाने आपल्या वडिलांसाठी यकृताचा भाग दान केला.Wockhardt Hospitals अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतिदक्षता सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयामुळे या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या.डॉ. स्वप्निल शर्मा यांनी सांगितले की, यकृत प्रत्यारोपण ही रुग्णांचे आयुष्य बदलणारी प्रक्रिया असून या यशामुळे नागपूरमध्ये जागतिक दर्जाच्या ट्रान्सप्लांट सेवा उपलब्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. डॉ. सौरभ नागर यांनी या यशाचे श्रेय वैद्यकीय कौशल्य, आधुनिक सुविधा आणि टीमवर्कला दिले.च्या टीमला यश आले आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र