अनिल कांबळे
नागपूर,
woman sexually assaulted फेसबुक मित्राने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शाेषण केले. मात्र, लग्न करण्यास नकार दिला आणि मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आराेप महिलेने केला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पाचपावली पाेलिसांनी 34 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून दाेन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नाेंदविला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिते महिलेची फेसबुकवर तुषार इंदूरकर नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. मैत्री फुलली आणि दाेघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. 24 जून 2023 च्या रात्री तुषारने महिलेला त्याच्या घरी आयाेजित एका कार्यक्रमामध्ये बाेलावले. या दरम्यान ताे तिला घरामागील माेकळ्या जागेत घेऊन गेला. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरीने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून ताे सतत तिचे लैंगिक शाेषण करीत हाेता. महिलेचा आराेप आहे की, जेव्हा तिने त्याला लग्नाबाबत विचारले, ताे टाळाटाळ करू लागला.woman sexually assaulted दबाव टाकला असता मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाहीतर त्याच्या एका नातेवाईक महिलेनेही पीडितेला अपमानित करीत घरातून हाकलून लावले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने घटनेची तक्रार पाेलिसात केली. पाेलिसांनी लैंगिक अत्याचार, फसवणूक, मारहाण आणि धमकीसह विविध कलमान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.