कोलकाता,
Yogis honour Shubhedu with saffron कोलकाता येथे पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात शुभेदूं अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करत त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडवले. ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या या सोहळ्याला देशातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली होती.
शपथविधीनंतर शुभेदूं अधिकारी यांनी मंचावर उपस्थित प्रमुख नेत्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. मोदी यांनीही त्यांना आलिंगन देत अभिनंदन केले. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा एक खास क्षण चर्चेचा विषय ठरला. योगी आदित्यनाथ यांनी स्वतःचा भगवा गमछा काढून शुभेदूं अधिकारी यांच्या खांद्यावर ठेवत त्यांचे स्वागत केले. हा प्रसंग उपस्थितांच्या विशेष लक्षात राहिला.