अमरावती,
Amravati–Mumbai train halted. रेल्वे विद्युत वाहिनीतून इंजिनला वीज पुरवठा करणारे पेंटाग्राफ तुटल्याने अमरावती - मुंबई गाडी शेगावच्या अलीकडे थांबली आहे. पेंटाग्राफ तुटला तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाला. भुसावळ वरून दुसरे इंजिन आल्याशिवाय ही गाडी पुढे जाणार नाही असे सांगण्यात येत आहे. किमान तीन तास लागतील. प्रवासी हैराण झाले आहे.