१० वी परीक्षांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्र डिजीलॉकर वर उपलब्ध

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
10th Marksheets and Certificates Available on DigiLocker फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र अपार-आयडीशी संलग्न स्वरुपात डिजिलॉकर वर उपलब्ध करुन देण्यात आले असून, यामध्ये परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र व बैठक क्रमांक नमूद करुन विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येतील.
 
 
DigiLocker
 
10th Marksheets and Certificates Available on DigiLocker  त्याकरिता हे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या EMarksheet- पोर्टलवर तसेच https://boardmarksheet.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे विभागीय मंडळाचे, विभागीय सचिव यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे