देणगी मागणार्‍या २१ महिलांची झाडाझडती; राज्याबाहेर रवानगी

*सात बालकांचाही सहभाग

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
वर्धा,
donations interrogated मॅजिक बूकचे नाव पुढे करीत देणगी मागणार्‍या महाराष्ट्राबाहेरील २१ महिलांसोबत तब्बल ७ बालक आढळून आल्याने या महिलांची महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन, पोलिस विभागाच्या अधिकार्‍यांनी झाडाझडती घेतली. महिलांनी दिलेली माहिती सर्व बाजूने तपासल्यावर तंबी देत त्यांची रेल्वेने महाराष्ट्राबाहेर रवानगी करण्यात आली.
 
 

donations interrogated 
 
 
राजस्थान व गुजरातमधील २१ महिला व त्यांच्यासोबत असलेले ७ बालक वर्धा शहरातील विविध भागात फिरून मॅजिक बुक विक्रीच्या नावाखाली देणगी मागत असल्याची माहिती पोलिस, महिला व बालविकास विभागाला मिळाली. त्यानंतर चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांच्या नेतृत्त्वातील चमू तसेच शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष टाले यांच्या नेतृत्त्वातील पथकाने महिलांना ताब्यात घेतले. महिलांसोबत ७ बालक असल्याने महिला व बालकांना महिला व बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यांच्याकडील कागदपत्रंही तपासण्यात आली.donations interrogated महिलांनी आपण महाराष्ट्रात देणगी मागणार नाही, अशी हमी दिली, शिवाय मूळ गावी परत जाण्याची इच्छा दर्शविली. शेवटी रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिसांच्या सहकार्याने २१ महिला व ७ बालकांना गावाकडे रवाना करण्यात आले.
 
या कारवाईत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण, पोलिस निरीक्षक संतोष टाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक बानोत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, चाईल्ड हेल्प लाईनचे आशिष मोडक, पोलिस कर्मचारी गहुकर, सीमा धोंगडे, महिला व बाल विकास विभागाच्या वैशाली मिस्कीन, माधुरी शंभरकर, शितल घोडराव, जयश्री निवल, सूरज वानखेडे, संतोष ढोणे, वैभव भानंदकर, रेल्वे सुरक्षा बलचे पोलिस उपनिरीक्षण मिश्रा, लोहमार्ग पोलिस विभागाचे भावे आदींनी सहकार्य केले.