भुमराळा फाट्यावर टिप्पर व मोटारसायकलची धडक; एक जण गंभीर जखमी

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
प्रतिनिधी भुमराळा
accident at Bhumrala Phata लोणार तालुक्यातील भुमराळा फाट्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजता घडली.
 
 
fata
 
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप शिवाजी राठोड (वय 40, रा. देवानगर) हे त्यांच्या एमएच 28 बीएन 4618 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून देवानगर येथून किनगाव जट्टूकडे जात होते. दरम्यान, एमएच 21 बीएच 8355 क्रमांकाचा वाळू वाहतूक करणारा टिप्पर डांबरी रस्त्यावर वळण घेत असताना मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला.
 
 
accident at Bhumrala Phata  या अपघातात संदीप राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलीस स्टेशनचे पीएसआय परमेश्वर शिंदे,पोहेका अरुण सानप,रवी चव्हाण,रवी बोरे, घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. जखमीच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.