नागपूरकर दाम्पत्याचा उत्तराखंडमध्ये दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
- गंगाेत्री महामार्गावरील भीषण अपघात; कार दरीत काेसळली

नागपूर, 
accident on a highway in Uttarakhandउत्तराखंडमधील गंगाेत्री महामार्गावर हेल्गुगाड परिसरात झालेल्या भीषण अपघातात नागपूर येथील ज्येष्ठ दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डाेंगर काेसळला आहे. मृतांची ओळख दिघाेरी येथील न्यू डायमंडनगर निवासी दामाेदर हरिराम रामटेककर (वय 77) आणि लक्ष्मी दामाेदर रामटेककर (वय 67) अशी करण्यात आली आहे. मृतदेह साेमवारी दुपारी नागपुरात आणण्यात आले आणि सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे.
 
 
ngp
 
accident on a highway in Uttarakhand मिळालेल्या माहितीनुसार, रामटेककर दाम्पत्य इतर प्रवाशांसह कारने गंगाेत्रीहून परत येत हाेते. दरम्यान, हेल्गुगाड परिसरात त्यांच्या वाहनावर अचानक माेठा दगड काेसळला. या जाेरदार धडकेमुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खाेल दरीत काेसळले. या भीषण अपघातात रामटेककर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक जसवीर सिंह आणि ओडिशातील एक दाम्पत्य थाेडक्यात वाचले. त्यांना किरकाेळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागपूरातील न्यू डायमंडनगर परिसरात शाेककळा पसरली असून, रामटेककर दाम्पत्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तराखंड पाेलिसांनी अपघाताची नाेंद करून पुढील तपास सुरू केला आहे.