अंजनगाव सुर्जी पोलिसांची कारवाई
अंजनगाव सुर्जी,
Accused Arrested with Deadly Weapons शहरात घातक शस्त्रांसह फिरून एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुस, तलवारी, दुचाकी, तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Accused Arrested with Deadly Weapons १ जून रोजी अंजनगाव पोलिसांना माहिती मिळाली की, तीन तरुण घातक शस्त्रे घेऊन गावात फिरत आहे. ते गंभीर गुन्हा करण्याचा तयारीत आहे. त्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुरज बोंडे यांनी गुन्हे शोध पथकाला शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी परतवाडा रोडवरील हॉटेल पद्मश्री जवळ सापळा रचला. काही वेळातच त्यांनी काळे नगर लेआऊट येथे दुचाकीवरून जाणार्या तीन युवकांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे उपरोक्त वर्णनाचे शस्त्र आढळून आले. वंश दिपक साहू, अनिल मदन सोळंके, अल्केश दिपक पवार अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात होऊ शकणारा एक मोठा संभाव्य गुन्हा टळला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विशाल पोळ, जयसिंग चव्हाण, रवि राठोड, अमित घाटे, मोहसिन पठाण, शुभम मारकंड, अक्षय शेळके यांनी केली.