अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Ahilyadevi Holkar पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती ३१ मे रोजी नागपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर युवक मंडळ, अहिल्यादेवी महिला मंडळ तसेच विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम धनगर युवक मंडळाच्या बालाजीनगर येथील कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला नागपूर शहरातील धनगर समाजातील बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले यांनी भूषविले.
 
Ahilyadevi Holkar
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे नागपूर शहराध्यक्ष अशोक खाडे, अहिल्यादेवी युवा मंचचे अध्यक्ष डॉ. प्रविण सहावे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खुशाल तांबडे, धनगर युवक मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील तसेच अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा हर्षा पाटील उपस्थित होते. Ahilyadevi Holkar कार्यक्रमात विविध वक्त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या समाजकार्य, प्रशासन कौशल्य आणि योगदानाची माहिती दिली. यावेळी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यामध्ये गणेश पावडे, नंदकिशोर गवारकर, देविदास आगरकर, दीपक अवताळे, उज्वल रोकडे, कैलास साटकर, त्रिलोचंद खरवडे, सुषमा कानडे, वैशाली रोकडे, विद्या खडसे, कीर्ती लाखे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. Ahilyadevi Holkar कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली भुजाडे यांनी केले.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र