एअर इंडियाच्या रद्द विमानसेवा पूर्ववत सुरु करा

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
केंद्रीय नितीन गडकरींचे एअर इंडियाला पत्र

नागपूर,
Air India' डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडियाच्या रद्द करण्यात आलेल्या विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे एअर इंडियाला पत्र दिले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात ही विमानसेवा पूर्ववत सुरु होण्याची शक्यता आहे. नागपूर ते—मुंबई मार्गावरील विमानसेवा कमी केल्यामुळे किंवा रद्द केल्यामुळे प्रवास, औद्योगिक उपक्रम, गुंतवणुकीच्या संधी आणि प्रवाशांच्या सोयींवर विपरीत परिणाम होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून तातडीने विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
 
 
air
निवेदनाला ठाम पाठिंबा
असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलमेंटचे अध्यक्ष आशीष काळे यांनी त्यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनाला ठाम पाठिंबा आहे. नागपूर हे वेगाने विकसित होत असलेले आर्थिक, औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स केंद्र असल्याने येथील हवाई संपर्कात कोणतीही तडजोड नये, असे त्यांनी एन. चंद्रशेखरन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
विमानसेवा तातडीने पूर्ववत करा
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून व्यवसाय, प्रशासन आणि क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे, याकडे लक्ष गडकरी यांनी एअर इंडियाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून किमान एक नागपूर—मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी केली. प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि जनसुविधांच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हब
Air India'  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरू असलेल्या आधुनिकीकरण आणि विस्तारकामांचा उल्लेख करत भविष्यातील विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात नागपूरचे वाढते महत्व सुध्दा अधोरेखित केले आहे. नागपूर हे वेगाने विकसित होणारे गुंतवणूक केंद्र बनत असून प्रदेशाच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी सक्षम हवाई संपर्क अत्यावश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले होते. एअर इंडिया टाटा समूह या आवाहनाला तसेच नागपूरच्या वाढत्या गरजांना सकारात्मक प्रतिसाद देत रद्द करण्यात आलेल्या विमानसेवा लवकरच पूर्ववत करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.