चंदीगड,
Punjab Police अमृतसरमधील माजिठा पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आणि पोलिस कोठडीत असलेल्या एका आरोपीला बळजबरीने सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग माजिठिया आणि इतरांना अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांनी सोमवारी विशेष पथक (एसआयटी)ची स्थापना केली. अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी पोलिसांनी माजिठिया यांच्या अमृतसर येथील निवासस्थानी भेट दिली असता ते तिथे उपस्थित नव्हते. अकाली दलाचे नेते माजिठिया आणि इतर सुमारे 50-60 जणांनी रविवारी बळजबरीने पोलिस ठाण्यात प्रवेश केला. त्यांनी कायद्याची पायमल्ली करत पोलिस ठाण्यातील खोल्यांची झडती घेतली. तसेच अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि खटल्यांशी संबंधित कागदपत्रांचे (केस फाइल्सचे) नुकसान केले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
कारवाई होणारच
व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असला तरी कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले असून या प्रकरणी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. Punjab Police मात्र, अकाली दलाने असा आरोप केला आहे की, ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती, ती व्यक्ती अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचा पोलिंग एजंट म्हणून कार्यरत होती. तसेच त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याऐवजी पोलिस ठाणाप्रमुखाच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीने रचलेल आणि खोट असल्याचा दावाही पक्षाने केजर अरहे.