'जब वी मेट’मधून वगळल्याने बसला मोठा धक्का

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
मुंबई
Bobby Deol बॉलिवूडमध्ये अभिनेता बॉबी देओल याने वेगळा ठसा उमटवला आहे. ओटीटी आणि सिनेपडद्यावर मिळालेल्या यशानंतर त्याच्या प्रोजेक्ट्सची रांग लागली असली तरी एक काळ असा होता, जेव्हा त्याची घसरलेली ‘मार्केट व्हॅल्यू’ त्याच्या करिअरवर परिणाम करत होती. याच काळातील एक महत्त्वाचा आणि भावनिक अनुभव बॉबी देओलने नुकताच उघड केला आहे.
 

Bobby Deol  
इम्तियाज अली दिग्दर्शित आणि 2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ हा हिंदी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटात शेवटी शाहिद कपूर आणि करिना कपूर ही लोकप्रिय जोडी झळकली. मात्र या प्रकल्पाशी सुरुवातीला बॉबी देओल जोडला गेला होता, असा खुलासा स्वतः त्याने केला आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, परिस्थिती बदलल्यामुळे आणि त्यावेळी त्याची बाजारातील मागणी कमी झाल्यामुळे त्याला या चित्रपटातून बाहेर व्हावे लागले, ज्याचा त्याला मोठा मानसिक धक्का Bobby Deol बसला.बॉबी देओलने सांगितले की, इम्तियाज अलींच्या कामावर त्याचा नेहमीच विश्वास होता आणि ‘सोचा ना था’ या चित्रपटापासूनच तो त्यांच्या प्रतिभेने प्रभावित झाला होता. पुढे जेव्हा ‘जब वी मेट’ची कल्पना पुढे आली, तेव्हा या प्रकल्पात सहभागी होण्याची त्याची इच्छा होती. विशेष म्हणजे, काही कलाकारांना या प्रोजेक्टशी जोडण्यातही त्याचा सहभाग होता, असेही त्याने नमूद केले.
मात्र प्रकल्प पुढे सरकत असताना परिस्थिती बदलली आणि त्याला या चित्रपटातून वगळण्यात आले. त्या काळात चित्रपटसृष्टीतील निर्णय अनेकदा कलाकाराच्या ‘मार्केट व्हॅल्यू’वर अवलंबून असतात, असे निरीक्षणही त्याने व्यक्त केले. या निर्णयामुळे तो भावनिकदृष्ट्या दुखावला गेला होता, मात्र आता त्या गोष्टीला तो मागे टाकून पुढे गेला असल्याचेही त्याने स्पष्ट केले.