पुलगाव-अमरावती मार्गावर बसची ऑटोला धडक

ऑटोतील सात प्रवासी जखमी

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
पुलगाव,
Bus Collides with Auto-rickshaw पुलगावहून अमरावतीकडे जात असताना वर्धा नदीजवळील रेवर पॉईंट परिसरात समोरून येणार्‍या ऑटोला धडक दिली. यात ऑटोतील ७ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज १ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव आगाराची चंद्रपूर-अमरावती एम.एच. १४ एम.एच. २७३४ क‘मांकाची बस पुलगावहून अमरावतीकडे जात असताना वर्धा नदीजवळील रेवर पॉईंट परिसरात पुढून येणार्‍या एम.एच. ३२ एके ०५८७ क‘मांकाच्या ऑटोला जोरदार धडक दिली.
 
 
accident
 
या अपघातात ऑटोमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना पुलगाव ग‘ामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून वर्धा येथील सामान्य रुग्णालर व सावंगी येथे पाठवण्यात आले. जखमींमध्ये गौरी सचिन डीवरे (२२), निळकंठ मनोहर पिंपळकर (४५), ललिता निळकंठ पिंपळकर (४०) तिन्ही रा. मारडा ता. समुद्रपूर, साक्षी गोपीचंद पाचुरटकर (३२) आर्यन गोपीचंद पाचुरटकर (१२), अनुष्का गोपीचंद पाचरुडकर (९) रा. सोनेगाव ता. बुटीबोरी जि. नागपूर, मंगेश बाबाराव उराडे (४०) रा. पुलगाव यांचा समावेश आहे. मंगेश उराडे हा ऑटो चालवीत होता.