‘त्या’ आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
- गोरेगाव येथील गोवंश प्राणी हत्या प्रकरण
गोंदिया, 
Cattle Slaughter Case गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातील तलावात गोवंशाचे अवशेष आढळून आल्याची घटना शनिवारी 30 मे दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तिव्र संताप व्यक्त करत आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, गोरेगाव पोलिसांनी रविवारी 31 मे रोजी तीन आरोपींना ताब्यात घेतले असताना आज, 1 जून रोजी तिघांना न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
 
 
kara
 
Cattle Slaughter Case गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीसंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 271, 272, 3(5) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 व 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान गोवंशीय प्राण्याच्या कानावरील बॅच क्रमांक, तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी तौफिक हनिफअली सैय्यद (28), हनिफ रफीक शेख (45) व शाहिद इस्माईल शेख (29) सर्व रा. आंबाटोली (घोटी) या तिन संशयीतांना ताब्यात घेतले तर गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली. सोमवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तिन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणाची पोलिस प्रशासन अत्यंत गांभीर्याने दखल घेत असून कायद्यानुसार कठोर व निष्पक्ष कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा अथवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
...