आता ‘झुरळं’ रस्त्यावर उतरणार

कॉकरोच पार्टीचे दिल्लीत आंदोलन

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
Cockroach Party आतापर्यंत फक्त समाज माध्यमांपुरतीच मर्यादित असणारी ‘कॉकरोच पार्टी’ आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याने शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी तो 6 जून रोजी भारतात परतणार आहेत.
  
cockroch party
Cockroach Party कॉकरोच पार्टीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिपके याने देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज उठवण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन राजीनाम्याची मागणी केली, तर सरकारला आपला आवाज ऐकावा लागेल, असे त्याने म्हटले आहे.