पटना,
Confirmed Railway Ticket कन्फर्म रेल्वे तिकीट असतानाही आरक्षित जागा न मिळाल्याने चार प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची दखल घेत ग्राहक आयोगाने भारतीय रेल्वेविरोधात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. प्रवाशांना योग्य सेवा देण्यात झालेल्या त्रुटीबद्दल रेल्वेला नुकसान भरपाईसह तिकिटाची रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील विंध्याचल येथून बिहारमधील आरा येथे जाण्यासाठी चार प्रवाशांनी एलटीटी-पाटणा एक्स्प्रेसचे आरक्षित तिकीट काढले होते. Confirmed Railway Ticket मात्र, रेल्वेत चढल्यानंतर त्यांच्या आरक्षित जागांवर इतर व्यक्ती बसलेल्या असल्याचे त्यांना आढळले. प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांना स्वतःच्या जागांवर बसण्याची संधी मिळाली नाही.
या प्रकारामुळे प्रवाशांना संपूर्ण प्रवास उभ्याने किंवा गैरसोयीच्या परिस्थितीत करावा लागला. त्यांनी रेल्वेच्या हेल्पलाइन, ऑनलाइन तक्रार यंत्रणा आणि सामाजिक माध्यमांद्वारेही मदत मागितली; मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. अखेर या प्रकरणी ग्राहक आयोगात दाद मागण्यात आली. Confirmed Railway Ticket सुनावणीदरम्यान आयोगाने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अपेक्षित सेवा पुरविण्यात कसूर केल्याचे नमूद केले. आरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याने संबंधित प्रवाशांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचे आयोगाने मान्य केले.
याप्रकरणी आयोगाने रेल्वेला प्रवाशांची तिकिटाची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल २० हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि न्यायालयीन खर्चासाठी १५ हजार रुपये देण्याचे निर्देशही दिले आहेत. ही रक्कम निश्चित कालावधीत अदा करण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले आहेत. दरम्यान, ग्राहक हक्कांबाबत हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. Confirmed Railway Ticket कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशांना जागा न मिळाल्यास किंवा सेवा देण्यात त्रुटी आढळल्यास संबंधित प्रवासी रेल्वेच्या अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेकडे तक्रार दाखल करू शकतात. आवश्यक असल्यास ग्राहक आयोगाकडेही न्याय मागता येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.